सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शाकुंतलम’ अखेर १४ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलम नाटकावरून प्रेरित आहे. याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संधी मिळेल तेव्हा तुम्ही भारतीयत्व…”; पाकिस्तानी अभिनेत्याने प्रियांका चोप्रावर केली टीका, नेमकं काय घडलं?

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार या चित्रटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी पाच कोटी रुपये कमावले. ‘शाकुंतलम’ चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषेत मोठ्या संख्येने स्क्रीनवर प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पोहोचले नाहीत. परिणामी सर्व भाषांमध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ५ कोटी रुपये कमावले. या कमाईपैकी ३२ टक्के वाटा हा तेलुगू राज्यांमधील आहे.

लग्नानंतर १२ वर्षे आई होऊ शकली नव्हती मंदिरा बेदी, मनोरंजनसृष्टीला जबाबदार धरत म्हणालेली, “हे क्षेत्र क्रूर…”

‘शाकुंतलम’ हा चित्रपट गुणशेखर यांनी लिहिला व दिग्दर्शित केला आहे. कालिदासाच्या अभिज्ञान शकुंतलम या लोकप्रिय नाटकावर आधारित, या चित्रपटात शकुंतलाच्या मुख्य भूमिकेत सामंथा आणि पुरू वंशाचा राजा दुष्यंताच्या भूमिकेत देव मोहन आहे. याशिवाय मोहन बाबू, जिशू सेनगुप्ता, मधु, गौतमी, आदिती बालन आणि अनन्या नागल्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu shakuntalam first day box office collection hrc