दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू अनेक महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा एका आजारानं ग्रस्त आहे. त्यावर ती काही काळांपासून विविध उपचार घेत आहे. आपला अनुभव ती सोशल मीडियाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जे त्याच आजाराने ग्रस्त असतील, त्यांना मदत व्हावी म्हणून ती तिनं घेतलेले उपचार अन् त्याच्या पद्धती अशा सगळ्याच गोष्टी आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करीत असते.
अशातच समांथानं आता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे टाकलेल्या एका पोस्टमधून तीन पानांची एक नोट शेअर केली आहे. त्यात समांथानं पर्यायी उपचार घेतल्यामुळे एका डॉक्टरनं तिला ट्रोल केलं याबद्दल अभिनेत्रीनं लिहिलं आहे.
हेही वाचा… “तरस नहीं आया…”, पुष्कर जोगने ‘या’ अभिनेत्रीसह केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री म्हणाली, “एका गृहस्थानं माझी पोस्ट आणि माझा हेतू यांच्यावर त्यांच्या शब्दांतून हल्लाच केला आहे. ते गृहस्थ डॉक्टर आहेत, असं ते म्हणाले. त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे याबद्दल मला शंका नाही. त्यांचा हेतूही चांगला असेल. पण, ज्या पद्धतीनं ते माझ्याशी बोलले, ते बोलणं जरा सौम्य असतं, तर बरं झालं असतं. या सगळ्यात त्यांनी मला तुरुंगात टाकायला हवं, असंदेखील म्हटलं.
समांथा घेत असलेल्या उपचाराबद्दल म्हणाली, “हे उपचार मला एका उच्च पदवीधर डॉक्टरांनी सुचवले होते जे MD आहेत; ज्यांना DRDO मध्ये २५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांनी मला पर्यायी थेरपीचा सल्ला दिला.”
समांथा ऑटो इम्युन कंडिशन (मायोसिटिस) नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. हा एक त्वचेचा आजार आहे. या आजारात इतर अनेक समस्यांसह स्नायू दुखतात. अनेक महिन्यांपासून या आजारावर ती उपचार घेत आहे. त्यामुळेच ती अभिनय क्षेत्रापासून दूर होती. परंतु, तिनं काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली; ज्यात तिनं सांगितलं की, ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे.
समांथा रुथ प्रभूच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, समांथा बॉलीवूड स्टार वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल : हनी बनी’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘सिटाडेल : हनी बनी’ ही आगामी वेब सीरिज रुसो ब्रदर्सच्या सिटाडेलचं भारतीय व्हर्जन (Indian Version) आहे. ‘सिटाडेल’च्या मूळ सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन यांनी भूमिका केल्या होत्या. भारतीय व्हर्जनमध्ये (Indian Version)मध्ये समंथा आणि बॉलीवूड अभिनेता वरुण धवन हे हनी आणि बनी यांच्या भूमिकांत दिसणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd