गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर आता ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे ती प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच समांथाने तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याद्वारे तिने चाहत्यांना चॅलेंज दिले आहे.
समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. समांथा ही तिच्या अभिनयासोबतच फिटनेसवरही कायम लक्ष केंद्रीत करत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वर्कआऊटदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत समांथाने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि जिमची पँट परिधान केली आहे. त्यासोबत तिने ट्रेनिंग शूज घातले आहेत. यात समांथा ही जम्प स्कॉट्सचा सराव करताना दिसत आहे. यावेळी तिची तग धरण्याची क्षमता, ताकद आणि जिम प्रती असलेला फोकस फारच चांगला असल्याचे पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना समांथा म्हणाली, “२०२२ ची सुरुवात…लेव्हल अप चॅलेंजने करा. जुनैद शेखने या माझ्या ट्रेनरने मला हे आव्हान दिले आहे. मी तुम्हाला चॅलेंज देते. चला लेव्हल अप चॅलेंज करुया,” असे तिने यात म्हटले आहे.
‘पुष्पा’ चित्रपटातील समांथाच्या ‘त्या’ आयटम साँगमधील पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली…
दरम्यान सध्या समांथाचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिने हे चॅलेंज दिल्यानंतर तिचे अनेक चाहते तिच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या अनेक चाहत्यांचे व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअरही केले आहेत. सध्या तिचा हा वर्कआऊटचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.