दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून कधी तिच्या घटस्फोटामुळे तर कधी तिच्या पहिल्या आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एका वेगळ्या कारणामुळे समांथा चर्चेत आली आहे. समांथाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे समांथा चर्चेत आली आहे.
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. समांथाने शेअर केलेला हा व्हिडीओ बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आहे. या व्हिडीओत प्रियांका बोलते, “मी जेव्हा ९ वर्षांची होती तेव्हा माझे आई-वडील मला सांगायचे की, तू कोणताही मार्ग निवडलास तरी तुझ्याकडे आर्थिक स्वातंत्र्य असायला हवे. तू कोणाची मुलगी आहेस, याचा काहीही फरक पडत नाही. तुझं लग्न कोणाशी झालं याचा काही संबंध नाही. तुला तुझ्या पायावर उभं रहायचं आहे आणि त्यात एक वेगळी शक्ती असते. हे सगळं माझ्या डोक्यात राहिलं. त्यामुळेच १२ वर्षांची असल्यापासून मी स्वप्न बघायला सुरुवात केली होती. मी प्रत्येक वर्षी मोठी झाल्यावर काय होणार हे ठरवायची आणि प्रत्येक वर्षी ते बदलायचं.” हा व्हिडीओ शेअर करत समांथाने प्रियांकाला टॅग करत रेड हार्टचं इमोटीकॉन वापरले आहे. प्रियांकाची ही जुनी मुलाखत आहे.
समांथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट होण्याआधी समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नागा चैतन्यचं आडनाव काढलं होतं, त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर प्रियांकाने पती निक जोनसचं आडनावं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काढून टाकल्यामुळे त्यांच्याही घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती.
आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये उडी मारताच अभिनेत्रीसोबत असे काही घडले की ICU मध्ये व्हावे लागले दाखल
आणखी वाचा : ‘पंतप्रधानांना जर भेटायची वेळ आली तरी मी…’, बिचुकलेचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, प्रियांकाचा ‘The Matrix: Resurrections’ हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे. प्रियांका लवकरच ‘जी ले जरा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ दिसणार आहेत.