दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा पती नागा चैतन्यशी नुकताच घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी घटस्फोटांची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. घटस्फोटाची बातमी सांगितल्यानंतर समांथाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. आता समांथाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

समांथाने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये टीका करणाऱ्यांना समांथाने सडेतोड उत्तर दिले आहे. “शुभ सकाळ, जेव्हा महिलांशी संबंधित एखादा मुद्दा असतो, तेव्हा त्यावर नैतिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित केले जातात, पण एखाद्या पुरुषाने केलं तर त्यावर प्रश्न नसतो. एक समाज म्हणून आपल्याकडे नैतिकता नसते,” अशा आशयाची पोस्ट समांथाने शेअर केली आहे.

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : Bigg Boss 15: ‘ही’ महिला स्पर्धक अंघोळ करत असताना प्रतीकने तोडला दरवाजा अन्…

गेल्या महिन्यात समांथा आणि नागा चैतन्य यांनी विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या दोघांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांचे चाहते हैराण झाले होते. समांथा आणि नागा चैतन्य हे २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी गोव्यात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केले. समांथा आणि नागा चैतन्य चित्रपटाच्या सेटवर रिलेशनशिपमध्ये आले होते.

दरम्यान, समांथाने ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर नागा चैतन्य आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. समांथा आणि नागा चैतन्यचे लाखो चाहते आहेत.

Story img Loader