दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या वर्षीपासून तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. त्या दोघांचा २ ऑक्टोबर रोजी घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. लग्नाच्या ४ वर्षानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता नागा चैतन्यविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या घोषणेच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर, नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. नागा चैतन्यने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यावेळी नागा चैतन्य कोणत्याही अभिनेत्रीसोबत लग्न करू इच्छित नाही. त्यामुळे त्याची होणारी पत्नी ही चित्रपटसृष्टीच्या बाहेरील असणार आहे. समांथाशी घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य खूप खचला होता.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

आणखी वाचा : Optical Illusion : चित्रातील व्यक्ती कोणत्या दिशेने धावते, जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व

रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य निराश झाला होता. अशा परिस्थितीत कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करू नये, अशी त्याची इच्छा आहे. पण अजूनही अक्किनेनी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या गोष्टीवर वक्तव्य केलेलं नाही.

आणखी वाचा : आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताचे नाव उंचावले, मुलाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता, म्हणाला…

समंथा रुथ प्रभूसोबत लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यचं नाव अभिनेत्री श्रुती हासनसोबतच्या जोडले जात होते. तर ते दोघं लग्न करणार असल्यात्या चर्चा देखील सुरु होत्या. तर त्या दोघांचा ब्रेकअप झाला आणि काही काळानंतर नागा चैतन्यच्या आयुष्यात समांथाची एण्ट्री झाली.

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

दरम्यान, समांथाचे करिअर पाहता नागा चैतन्य आणि तिच्यात वाद सुरु असल्यामुळे ते विभक्त झाले असे म्हटले जाते. घटस्फोटाच्या घोषणेनंतर अभिनेत्री समंथाचा बोल्ड अवतार आणि बोल्ड चित्रपटांच्या पसंतीही चर्चेत होत्या. याशिवाय पुष्पा चित्रपटातील बोल्ड आयटन सॉन्गमुळे ती चर्चेत होते.

Story img Loader