संमाथा रुथ प्रभू सध्याची भारतीय सिनेसृष्टीमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तेलुगू सुपरस्टार नागा चैतन्य यांच्याशी तिने लग्न केले होते. २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या प्रकरणामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरु होती. याच सुमारास तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामध्ये काम केले. तिच्यावर चित्रीत झालेले ‘ऊ अंतावा’ हे गाणं तुफान व्हायरल झाले. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्येही ती सहभागी झाली होती.

२०२१ मध्ये संमाथा ‘द फॅमिली मॅन’ या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकली. या सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटी क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तिच्या राजी या भूमिकेचे खूप कौतुक झाले. दरम्यान तिने विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासह या ‘काथुवाकुला रेंदु काधळ’ (Kaathuvaakula Rendu Kaadhal) चित्रपटामध्ये काम केले. लवकरच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंबंधित नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “हा मुलगा कोण?”, ‘मनमर्जिया’च्या ट्रेलरमध्ये विकी कौशलला पाहून कतरिनाला पडला होता प्रश्न

काही दिवसांपूर्वी तिच्या या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये संमाथा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचे टीझर पाहिल्यावर लक्षात येते. हरी शंकर आणि हरीश नारायण या जोडीने यशोदा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकतंच एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्रात झळकणार पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

या कार्यक्रमामध्ये निर्माते एस. कृष्णा प्रसाद म्हणाले, “हा नव्या धाटणीचा साय-फाय थरारपट आहे. संमाथाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून तिने स्वत:हून तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये डब केला आहे. चित्रपटाची निर्मिती करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणे टाळले आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही १०० दिवसांमध्ये चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. नव्या पद्धतीचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट मेजवानी ठरणार आहे.”

Story img Loader