साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु अखेर विभक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून समांथा आणि नागा चैतन्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. दोघंही विभक्त होणार असं वृत्त होतं. अखेर या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय. समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर समांथा आणि नागा चैतन्य विभक्त होत आहेत.

दरम्यान, समांथाला नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून तब्बल २०० कोटी रुपयांची पोटगी ऑफर करण्यात आल्याचं वृत्त आहे. एवढचं नव्हे तर समांथाने या पोटगीला नकार दिल्याचं देखील कळतंय. बराच विचार केल्यानंतर समांथाने या पोटगीला नकार दिला असून तिला नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून एक रुपया देखील नको असल्याचं तिने स्पष्ट केल्याचं म्हंटलं जातंय. समांथाने तिच्या अभिनय कौशल्यावर टॉलिवूडमध्ये मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वत:च स्थान निर्माण केलंय. त्यामुळे या घटस्फोटाच्या आधारावर तिला कोणत्याही प्रकारे पैश्यांची गरज नाहीय.

जीवापाड प्रेम, शाही विवाह, ४० दिवसांचं हनीमून तरीही चार वर्षात काडीमोड, समांथा-नागा चैतन्यची ‘लव्हस्टोरी’

समांथा सध्या तिच्या खासगी आयुष्यापेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचं समांथाच्या जवळच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय. “दररोज उठून कामाला जाणं हे समांथासाठी सध्या सोप नाहीय. ती कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्यामुळे तिच्या कोणत्याही प्रोजेक्टवर परिणाम होवू नये अशी तिची इच्छा आहे. ती खूप प्रोफेशनल आहे. या परिस्थितीला ती खंबीरपणे सामोरं जात आहे.” असं जवळच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

‘अशी’ होती पहिली भेट आणि ‘असं’ केलं होतं प्रपोज ; समांथा आणि नागा चैतन्यची लव्हस्टोरी

काय म्हणाले आहेत पोस्टमध्ये?

समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केलाय. “आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेल हे नात कायम राहिलं. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद,” अशा आशयाची पोस्ट समांथा आणि नागा चैतन्याने केलीय.