अभिनेत्री संभावना सेठ सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती बिनधास्त व्यक्त होते. हिंदी ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे संभावना प्रकाशझोतात आली. मध्यंतरी आपण आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त असल्याचं तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं. आता ती पतीसह दुबईमध्ये व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसत आहे.
संभावना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खासगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. आताही तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे दुबईला गेली असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती २४ कॅरेट गोल्डन कॉफी पिताना दिसत आहे. पण या कॉफीमागचा किस्साही तिने सांगितला आहे.
संभावनाचा पती अविनाशने तिला खूश करण्यासाठी गोल्डन कॉफी मागवली. दोघंही ही कॉफी पिण्यासाठी उत्सुक होते. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच घडलं. या गोल्डन कॉफीची चव संभावनाला अजिबात आवडली नाही. फक्त सोन्याचे पैसे घेतले त्यापेक्षा तर माझी ब्लॅक कॉफी उत्तम असते असंही संभावना म्हणाली.
गोल्डन कॉफी खूप महाग असल्यामुळे दोघांनी मिळून एकच कॉफी ऑर्डर केली. पण एकदाच ही कॉफी पिणं ठिक आहे. पुन्हा पुन्हा गोल्डन कॉफी पिऊ शकत नसल्याचंही या दोघांनी व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मात्र या कॉफीची किंमत नेमकी किती आहे हे त्यांनी सांगितलं नाही.