गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) संचालक समीर वानखेडे आर्यन खानच्या अटकेमुळे आणि क्रूझ छापे प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्यन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याच्या जामिनाची सुनावणी बुधवारी होणार आहे. आज समीर यांना अनेक लोक हीरो म्हणून बोलतात. तर समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांतीने त्यांच्या करिअरच्या प्रत्येक वळणावर त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीबद्दल खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांतीने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. यावेळी क्रांती म्हणाली की, “समीर योग्य पद्धतीने प्रेशर हाताळू शकतात. समीर अनेक भारतीय ऐतिहासीक नेत्यांच्या विचारांशी जोडले गेले आहेत. जगातील अनेक वेगवेगळ्या नेत्यांच्या कहाण्या वाचून ते मोठे झाले आहेत.”

पुढे क्रांती म्हणाली, “समीर यांचे वडील ज्ञानदेव वाणखडे हे एक पोलिस अधिकारी होते. ते आता निवृत्त झाले आहेत. जेव्हा पण समीर यांना काही अडचणी असतील किंवा कोणता निर्णय घ्यायचा असेल आणि त्यांना काही कळतं नसेल तर ते वेळोवेळी त्यांच्या वडिलांचा सल्ला घेतात. त्यांचे वडील त्याच्या कारकिर्दीमध्ये समीरला योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रकाशाप्रमाणे आहेत.

आणखी वाचा : अमिताभ यांना नात आराध्याने दिल्या खास शुभेच्छा, ऐश्वर्याने शेअर केला फोटो

समीर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. वानखेडे यांच्यासह एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन हे देखील यावेळी उपस्थित होते. दोनजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा : “…एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है”, कविता शेअर करत स्वरा भास्करने शाहरुखला दिला पाठिंबा

समीर यांनी पहिल्यांदाच असे छापे टाकले नाही. तर २००७ मध्ये, जेव्हा ते मुंबई विमानतळावर कस्टम ऑफिसर म्हणून कार्यरत होते, तेव्हा ते कडक शिस्तीने सगळ्या नियमांचे पालन करायचे. आता समीर यांना लोक खऱ्या आयुष्यातील सिंघम बोलत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede booming career who helped him wife kranti redkar reveals dcp