कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीनं २ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खान आणि इतर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जवळपास गेल्या दोन आठवड्यांपासून आर्यन मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर चर्चेत आहेत. दरम्यान, एका वेबसाइटने क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक दिले आहे. ते पाहून क्रांतीने संताप व्यक्त केला आहे.

क्रांतीने ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ‘तुम्ही हे काय करत आहात? काही मोजक्या व्ह्यूजसाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिले आहे आणि ते कशासाठी? मी या प्रकरणी कोर्टात केस लढवली होती आणि ती जिंकलीसुद्धा होती. मी पूर्ण वृत्त वाचले, त्यात चुकीच्या ओळखीच्या प्रकरणाबाबत लिहिले आहे. पण मग असे शीर्षक का दिले? फक्त पैशांसाठी की माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी?’ या आशयाचे ट्वीट क्रांतीने केले आहे.
आणखी वाचा : मन्नतवर पोहोचलेल्या NCB अधिकाऱ्यांना शाहरुख म्हणाला, “तुम्ही चांगलं काम करताय, पण आर्यनला…”

आणखी वाचा : ‘चांगले वर्तन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे…’, स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

पुढे ती ट्वीटमध्ये म्हणाली, ‘प्रत्येकजण संपूर्ण वृत्त वाचत नाही. तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लिखाणामुळे आम्हाला ट्रोल केले जात आहे. आम्हीही माणूस आहोत, आम्हालाही भावना आहेत. अशा बातम्या खपून घेतले जाणार नाही. जर मी दोषी असते, तर मी माझी चूक मान्य केली असती. पण मी दोषी नाही म्हणून मी हे सहन करणार नाही.’ सध्या तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय आहे प्रकरण?

एका वृत्तवाहिनीनेन आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्रांती रेडकरचे नाव दिले होते. या प्रकरणी क्रांतीने त्या वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा खटला लढवला होता. या खटल्याचा निकाल क्रांतीच्या बाजूने लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा याबाबत एका वृत्तावाहिनीने वृत्त दिल्यामुळे तिने संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader