समीरा रेड्डी आता ‘वर्देंची’ झाली. होय, अभिनेत्री समीर रेड्डी हीचा ‘वर्देंची’ सुपरबाईक्स कंपनीनेचे मालक अक्षय वर्दे यांच्याशी विवाह झाला आहे.
मोठ्या थाटात समीराचा विवाह सोहळा झाला. समीरा रेड्डी विवाह करणार असल्याच्या बाबतीत आजपर्यंत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. समीराला याआधीपासूनच वेगवान बाईक्सची आवड आहे. त्यात तिची जवळपास दोन-अडीच वर्षांपूर्वी ‘वर्देंची’ सुपरबाईक्सचे मालक अक्षय वर्दे यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्याही मध्यंतरी होत्या.
समीराच्या वांद्रे येथील निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम घेऊन या दोघांचा साखरपुडाही झाला होता. तसेच एप्रिल २०१३ मध्ये दोघांच्या विवाहाची तारिख पक्की करण्यात आली होती. परंतु, कंपनीच्या कामात अक्षय व्यस्त असल्याने त्यापुढे जानेवारीत विवाह सोहळा करण्याचे ठरले. त्यानुसार विवाह सोहळा झाला आणि आज समीरा रेड्डी ‘वर्देंची’ झाली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा