आलिया भट्ट, बिपाशा बासू सारख्या अभिनेत्रींनी आपण आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. सोनम कपूरनेही काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. बी-टाऊनमध्ये अभिनेत्रींच्या गरोदरपणाबाबत बरीच चर्चा रंगताना दिसते. या दिवसांमधील अभिनेत्रींचं फोटोशूट तर चर्चेचा विषय असतो. आता याच कारणामुळे अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) चर्चेत आली आहे. तिने तिच्या गरोदरपणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला पाहून चाहतीला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

समीराला दोन मुलं आहेत. २०१९मध्ये समीराने एक गोंडस मुलीला जन्म दिला. गरोदरपणातील फोटो, व्हिडीओ ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसली. आता पुन्हा एकदा तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. समीराने गरोदरपणात अंडरवॉटर फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती.

पाहा व्हिडीओ

इतकंच नव्हे तर दोन ते तीन वर्षांनंतर समीराने अंडरवॉटर फोटोशूट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. बिकिनी परिधान करत तिने हे फोटोशूट केलं होतं. या व्हिडीओमुळे समीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. “माझ्या आयुष्यामधील सर्वात सुंदर क्षण. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. प्रत्येक क्षण आनंदाने साजरे करा.” असं समीराने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘चलो इश्क लडाए सनम’ म्हणत दहीहंडी कार्यक्रमामध्ये नवनीत राणांचा गोविंदासह धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

समीराने व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला चांगला प्रतिसाद दिला आहे. आम्हाला देखील आमच्या गरोदरपणातील दिवस आठवले, खूप सुंदर, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. समीराने २००२ मध्ये सोहेल खान सोबत ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समीराने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. समीराने २०१४ मध्ये बिजनेसमॅन अक्षय वर्देशी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव हे हंस आणि मुलीचे नाव नायरा आहे.

Story img Loader