अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून मेलव्हनवर जोरदार टीका केली आहे.
अवश्य वाचा – प्रेम शेअर करा पण ****** करु नका; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप
अवश्य वाचा – बॉयफ्रेंडपेक्षा वेटर बरा; ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडला टोला
काय म्हणाली सना खान?
“खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं” अशा आशयाची पोस्ट सनाने लिहिली आहे.
अवश्य पाहा – हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?
अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा
मेलव्हनचे ज्या मुलींसोबत संबंध आहेत, त्यांच्यापैकी एका मुलीला सना ओळखते असा दावा तिने या पोस्टमध्ये केला आहे. तिला देखील सनाने फटकारले आहे. ती म्हणाली, “जूनच्या आसपास मला त्यांच्या रिलेशनशिपबाबत समजलं. ते बघून तर मला धक्काच बसला. मी आत्ता तुझं नाव घेत नसली तरी लवकरच तुझं पितळ मी जगासमोर उघड पाडणार आहे.”