पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदशी तिसरं लग्न केलं आहे. दोन दिवसांपूर्वी शोएबने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्या लग्नाची बातमी दिली. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएबला घटस्फोट दिला, त्यानंतर त्याने लग्न केलं. सना व शोएब एकमेकांना डेट करत होते. सना जावेदचं हे दुसरं लग्न असून शोएबचं हे तिसरं लग्न होय. शोएबशी लग्न केल्यावर सना जावेदने पहिली पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सना जावेदने शोएबशी लग्न केल्यावर तिचं इन्स्टाग्रामवरील नाव बदलून सना शोएब मलिक असं केलं आहे. आता सनाने लग्नातील एक फोटो पोस्ट करत रेड हार्ट इमोजी कॅप्शनमध्ये दिला आहे. फोटोमध्ये सना व शोएबने एकमेकांना मिठी मारली आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

सनाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सानिया मिर्झाचा उल्लेख करत कमेंट्स केल्या आहेत. ‘पाकिस्तानमधून सानिया मिर्झासाठी आदर’, ‘जो बायको प्रामाणिक असूनही तिचा झाला नाही, तो तुझा काय होणार’, ‘शोएबभाई चौथं लग्न कधी आहे?’, ‘हिने उमर जसवालबरोबरही असेल फोटो काढले होते’, ‘हा तुझीदेखील फसवणूक करणार’, ‘तुला लाज वाटत नाही का, एक महिला असून दुसऱ्या महिलेचा संसार उद्ध्वस्त केलास,’ अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर युजर्स करत आहेत.

शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर अभिनेत्री सना जावेदने केला ‘हा’ मोठा बदल, इन्स्टाग्रामवर…

सना जावेदच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान, सानिया व शोएब मागच्या काही काळापासून वेगळे राहत होते. सानियाने शोएबबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवरून हटवले होते, त्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली होती. इतकंच नाही तर सानियाने बऱ्याचदा घटस्फोटाबाबत भाष्य करणाऱ्या स्टोरीज पोस्ट केल्या होत्या, पण तिने कधीच याबाबत जाहिरपणे माहिती दिली नव्हती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sana javed trolled for sharing photo with shoaib malik sania mirza ex husband hrc