पंधरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी चर्चेत असलेली सना खान ही सलमान खानच्या बिग बॉस या रियालिटी शोमधील एक स्पर्धक होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनाच्या अचानक नाहिशी होण्याने ‘मेंन्टल’ चित्रपटाच्या चित्रिकरणावर परिणाम झाला आहे. परंतु, निर्माता-दिग्दर्शक सोहेल खानच्या म्हणण्यानुसार ‘मेंन्टल’ चित्रपटाच्या सध्या चालू असलेल्या चित्रिकरणात सनाची आवश्यकता नाही. याबाबत सूत्रांकडून सांगण्यात आले की, सनाच्या अनुपस्थितीमुळे चित्रिकरणावर परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. चित्रपटातील तिची भूमिका फार मह्त्वाची नसून चित्रपटातील प्रमूख स्त्री भूमिका  तब्बू आणि डायसी यांच्या आहेत. सलमान खानने कोणतीही आडकाठी न घेता सनाला चित्रपटात काम देण्याविषयी वचन दिले होते आणि त्याप्रमाणे सलमाने तिला ‘मेंन्टल’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. जो पर्यंत खरोखरच गरज भासत नाही, तो पर्यंत सलमान आणि सोहेल तिची भूमिका दुस-या कोणाला देणार नाहीत. जर असेच करण्याची वेळ आली तर चित्रपटातील तिची भूमिका अतिशय छोटी असल्याने तसे करण्यात अजिबात अडचण येणार नाही. त्याशिवाय ती सध्या चालू असलेल्या चित्रिकरणाची भाग नसल्याने चित्रिकरणावर परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. सोहेल खानला संपर्क साधला असता तो म्हणाला, तुमच्याप्रमाणे मीदेखील सनाबाबत वृत्तपत्रांतून बातम्या वाचत आहे. तिच्याबरोबर काय घडत आहे, याची मला पुसटदेखील कल्पना नाही.  परंतु, जवळजवळ महिनाभर तरी तिची चित्रिकरणासाठी आवश्यकता नसून, तोपर्यंत तिच्या समस्यांचे निराकरण होऊन तिचे जीवन पुन्हा सामान्य होईल, अशी आशा आहे.

Story img Loader