प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या जोडीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. संदीप खरे हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता संदीप खरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेक रुमानी खरे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे.

संदीप खरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यांच्या मुलीच्या छोट्या पदार्पणाविषयी सांगत संदीप म्हणाले, “लाडकी लेक रूमानी आज टीव्हीवर पदार्पण करतेय, एका छान भूमिकेतून. आजपासून सुरु होत असलेल्या एका नव्या मराठी मालिकेतून. ‘तू तेव्हा तशी’ झी मराठी वर आज रात्री ८ वाजता. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिच्याही पाठीशी सदैव राहू देत, हीच प्रार्थना.”

आणखी वाचा : ‘I Hate Kashmir Flies…’, राम गोपाल वर्मांच्या कमेंटवर विक्रम अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

रुमानीला अभिनयाची फार आवड आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘चिंटू’ आणि २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिंटू 2’ या चित्रपटांमध्ये रुमानी दिसली होती. बालकलाकार म्हणून तिने काम केलं होतं. अभिनयासोबतच तिला डान्सचीही फार आवड आहे. रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. २०१९ मधील ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीची चित्रपटसृष्टीत डॅशिंग एण्ट्री, डान्समध्ये वडिलांनाच दिली टक्कर

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांसोबत अभिनेत्री अभिज्ञा भावे दिसणार आहे. या मालिकेत अभिज्ञा पुष्पावल्लीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

Story img Loader