‘देवयानी’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. संग्राम आणि खुशबू लवकरच आई-बाबा होणार असून खास फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली आहे. संग्राम आणि खुशबू दोघांनीदेखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
५ सप्टेंबरला खुशबूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामने दोघांचा एक खास फोटो शेअर केला. यावेळी खुशबूला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत त्याने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. संग्रामने शेअर केलेल्या फोटोत खुशबू बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, “होणाऱ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला त्रास देणारा आता मी एकटाच नाही! माझ्या सर्व गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या चुमकल्या पार्टनरची आतूरतेने वाट पाहतोय” असं तो कॅप्शनमध्ये म्हणालाय. संग्रामच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा: “आम्हाला आमचा नवीन कुंग-फू पांडा मिळाला”; दिशा पटानीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
तर अभिनेत्री खुशबू तावडेने देखील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोत बेबी बंपमध्ये खुशबूचा क्यूट अंदाज पाहायला मिळतो. तर संग्राम आणि खुशबू दोघांची जोडी खूपच सुंदर दिसतेय. “आमच्या कुटुंबात आणखी प्रेम वाढवत आहोत” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. खुशबूच्या फोटोवर देखील अभिनेत्री अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख, तेजस्वीनी पंडीत तसचं श्रेया बुगडे आणि सुयश टिळक अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
संग्राम साळवी ‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेसोबतच ‘मी तुझीच रे’ तसचं ‘आई माझी काळूबाई’ या मालिकांसह अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. तर खुशबू तावडे देखील ‘एक मोहोर अबोल’, तू भेटशी नव्याने, पारिजात या मालिकांमध्ये झळकली आहे. तसचं तारक मेहता का उल्टा चष्मा, प्यार की ये एक कहानी अशा हिंदी मालिकांमध्ये देखील खुशबूने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सांजबहर’ या शॉर्ट फिल्ममध्ये संग्राम आणि खशबू एकत्र झळकले होते. यावेळीच दोघांमध्ये सूत जुळलं होतं. त्यानंतर मार्च २०१८ सालामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.