‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा जोडीदार आणि कुस्तीपटू संग्राम सिंह संतापला आहे. पायल रोहतगीच्या अटकेची बातमी समजताच संग्राम सिंह मुंबईहून अहमदाबादला पोहोचला आणि आता तो म्हणतो की सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना आधीच पैसे दिले होते. पायलला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली.
पायलवर सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर चेअरमनविषयी सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरल्याचा आरोप केला आहे. आता संग्रामने त्याची प्रतिक्रिया केली आहे.
View this post on Instagram
संग्राम म्हणाला, पायलने जेव्हापासून सोसायटीत फ्लॅट घेतला आहे, तेव्हा पासून सोसायटीतले लोक सारखे हस्तक्षेप करत आहेत. पायल जेव्हा कोणाला मुलाखतीसाठी घरी बोलावते तेव्हा सोसायटीतले लोक ते होऊ देत नाही. आता सोसायटीतल्या लोकांनी पायलकडून पाच लाखांचा निधी मागितला आहे. पायल जेव्हा सोसायटीच्या बैठकीत हजर झाली, त्याआधीच सोसायटीच्या लोकांनी पोलिसांना बोलावले होते. कदाचित त्यांनी पोलिसांना पैसे दिले असतील. त्यामुळे पायलला अटक करण्यात आली आहे. पायल बोलायला गेल्यावर तिला थांबविण्यात आले.
आणखी वाचा : सोसायटीत भांडण आणि चेअरमनला शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक
संग्रामने एका मुलाखतीत सोसायटीच्या चेअरमनसोबत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. संग्राम म्हणाला की पायलने पाच वर्षांपूर्वी त्या सोसायटीत फ्लॅट घेतला होता. मात्र, सोसायटीतल्या लोकांना पायलचे तिथे राहणे आवडत नाही.
संग्राम पुढे म्हणाला की जेव्हा पायल सकाळी योगा करत होती तेव्हा पोलिस आले आणि तिला बंदुक दाखवून घेऊन गेले. तिच्यासोबत गैरवर्तन केले. महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलेत लगावली. मी स्वत: पोलिस फोर्सचा एक भाग होता, असं कोणालाही अटक केलं जातं नाही. पायलने एका नोटिसवर सही केल्यानंतरच तिला जामीन मिळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत आहे.