स्टार प्रवाहवर ७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची आवड होती. सानिया मूळची पुण्याची त्यामुळे पुण्यातच तिने नृत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सानियाची प्रतिभा पाहून तिला स्टार प्रवाहच्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेसाठी ऑडिशनसाठी सांगण्यात आलं. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लूक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत असल्याचं सानिया सांगते. “मालिकेचा प्रोमो ऑनएअर गेल्यानंतर मला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉरर आणि रोमान्स हा जॉनर मी पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळेसोबत पहिल्यांदाच काम करते आहे. आम्ही तिघेही पुण्याचे असल्यामुळे आम्हा तिघांची खूप छान गट्टी जमली आहे. हीच केमिस्ट्री तुम्हाला मालिका बघताना नक्कीच जाणवेल”, असं ती म्हणाली. ही नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania chaudhary debut on small screen through sang tu aahes ka ssv
First published on: 01-12-2020 at 20:05 IST