भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं बोललं जात होतं. १२ वर्ष संसार केल्यानंतर आता ते घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं आहे. अशातच या दोघांबद्दल एक वेगळीच बातमी समोर येत आहे. ते खऱ्या आयुष्यात जरी एकमेकांपासून वेगळे होत असले तरी छोट्या पडद्यावर ते आता एकत्र झळकणार आहेत.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या या आगामी कार्यक्रमाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाचं नाव ‘द मिर्झा मलिक शो’ असं आहे. मार्च महिन्यात शोएबने या कार्यक्रमाची घोषणा केली होती. हा कार्यक्रम ‘उर्दूफ्लिक्स’वर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून सानिया आणि शोएब पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करता दिसणार आहेत.

आणखी वाचा : “…म्हणून माझा मुलगा चित्रपटसृष्टीपासून असतो दूर”; अक्षय कुमारने स्पष्ट केले कारण

‘उर्दूफ्लिक्स’ने या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच रिलीज केले. या पोस्टरमध्ये सानिया आणि शोएब दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.

हे पोस्टर पाहून सानिया आणि शोएबच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर येत आहे. तर दुसरीकडे ही दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत, हे समजल्यावर त्यांचे चाहते अत्यंत खुश झाले आहेत. तर काहीजण सानिया आणि शोएब यांना ट्रोलही करत आहेत.

हेही वाचा : Photos: फक्त सानिया मिर्झाच नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड कपल्सच्याही घटस्फोटांच्या रंगल्या होत्या चर्चा

दरम्यान सानिया आणि शोएब यांचा प्रेमविवाह झाला होता. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सानिया मिर्झा हिने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव इझान असे आहे. सध्या सानिया ही ३५ वर्षांची असून शोएब मलिक हा ४० वर्षांचा आहे.

Story img Loader