प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ही तिच्या दिलदार स्वभावासाठी ओळखली जाते. ‘बिग बॉस १६’चा विजेती एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा यांचे नातेही खूप चांगले आहे. बिग बॉसच्या यंदाच्या सीझन समाप्तीनंतर दोघेही फराह खानच्या पार्टीत एकत्र दिसले होते. एमसी स्टॅनदेखील सानियाला आपली मोठी बहीण मानतो, तो तिला ‘आपा’ म्हणून हाक मारतो हेदेखील सगळ्यांना ठाऊक आहे.

एमसी स्टॅनने नुकतंच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सानिया मिर्झाचे आभार मानले आहेत, खरं तर सानियाने एमसी स्टॅनला शूज आणि चष्मा भेट दिला आहे. सानिया मिर्झाच्या या भेटवस्तूची किंमत लाखोंमध्ये आहे, यामुळेच याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. सानिया मिर्झाच्या भेटवस्तूचा फोटो शेअर करत एमसी स्टॅनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘इसमें घर जाएगा तेरा, बहुत धन्यवाद आपा’. स्टॅनची ही इंस्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Nair Hospital Dental College received prestigious Pierre Fauchard Academy award for societal contribution
नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा अमेरिकास्थित ‘पिएर फॉचर्ड अकॅडमी’तर्फे सन्मान!
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

आणखी वाचा : चित्रपट फ्लॉप झाल्याने सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण… शबाना आजमींनी केला खुलासा

चाहत्यांना सानिया आणि एमसी स्टॅनचा हा बॉन्ड खूप आवडतो. सानियाने दिलेल्या दोन्ही भेटवस्तूंची किंमत सुमारे १.२१ लाख असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटवस्तूंची किंमत जाणून चाहते सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढी महागडी भेटवस्तू पाहून चाहत्यांनी कॉमेंटमध्ये स्टॅनचा डायलॉग लिहीत त्याचं अभिनंदन केलं आहे तर सानियाचा हा दिलदारपणासुद्धा चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

mc-stan-story
mc-stan-story

एमसी स्टॅन आणि सानिया मिर्झा फराह खानच्या मुंबई पेंटहाऊसमध्ये बिग बॉस १६ च्या पोस्ट-फिनाले पार्टीमध्ये भेटले. ते लगेचच एकमेकांचे मित्र बनले. विशेष म्हणजे, स्टॅनने सानिया मिर्झाच्या हैद्राबाद येथे टेनिस रिटायरमेंट सोहळ्यातही परफॉर्म केले होते. एमसी स्टेनने बिग बॉस १६ च्या घरात त्याच्या खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

Story img Loader