बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता नेहमीच आपल्या चाहत्यांना त्यांचे अपडेट देत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते आपल्या कुटुंबियांचे फोटो सतत शेअर करत असतात. सध्या दत्त कुटुंबिय यूरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मान्यताने नुकतेच तिचे काही युरोप टूरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती आपली मुलं आणि संजू बाबाबरोबर सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. ५७ वर्षीय संजयने ३७ वर्षीय मान्यताशी २००८ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला इकरा आणि शहरान ही जुळी मुलंही आहेत. मुलांसोबत मान्यता या महिन्याच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय दत्तबद्दल बोलायचे झाले तर, पाच वर्षांचा तुरुंगवास भोगून तो काही महिन्यांपूर्वीच बाहेर आला आहे. यानंतर त्याने भूमी या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली. ओमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमात अदिती राव हैदरी ही त्याची मुलगी दाखवण्यात आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमाची संहिता वाचून संजयला रडूच कोसळले होते. संजयला शेवटचे आमिरच्या पीके या सिनेमात पाहण्यात आले होते. भूमी सिनेमानंतर संजय ‘साहेब बिवी और गँगस्टर’ आणि ‘तोरबाज’ या सिनेमांमध्येही दिसेल. संजयला पहिल्या पत्नीपासून २८ वर्षांची त्रिशाला ही मुलगी आहे.

भूमी या सिनेमासाठी दिग्दर्शक ओमंग कुमार आणि निर्माते संदीप सिंह आणि भूषण कुमार यांना या सिनेमाची संहिता लवकरात लवकर पूर्ण करायची होती. आतापर्यंत लेखक राजा शांडिल्या यांनी आतापर्यंत फक्त विनोदीपटाच्याच संहिता लिहिल्या होत्या. पण भूमी सिनेमाचं आव्हान स्वीकारून त्याने दोन महिन्यात या सिनेमाची संहिता लिहून पूर्ण केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt and maanyata went to europe and have great holiday pics