बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेले असून, त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे वृत्त कानावर येत आहे. ‘संजय दत्त प्रॉडक्शन’ या संजय दत्तच्या स्वत:च्या निर्मितीसंस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्माती संजय दत्तची पत्नी मान्यता असणार आहे. संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांनी याआगोदर ‘मुन्नभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या नावाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे सह-निर्माता असून, रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, संजय दत्तच्या जवळच्या सुत्रांनी चित्रपटाची बोलणी प्राथमिक अवस्थेत असल्याचे सांगत याबाबत इतक्यात काही बोलण्यास नकार दिला. १९९३ च्या मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहात मे २०१३ पासून पाच वर्षाची शिक्षा भोगत आहे.
संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट?
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेले असून, त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे वृत्त कानावर येत आहे.
आणखी वाचा
First published on: 06-05-2014 at 05:31 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसंजय दत्तSanjay Duttहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt biopic in the initial stage