बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेले असून, त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे वृत्त कानावर येत आहे. ‘संजय दत्त प्रॉडक्शन’ या संजय दत्तच्या स्वत:च्या निर्मितीसंस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. राजकुमार हिरानींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्माती संजय दत्तची पत्नी मान्यता असणार आहे. संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांनी याआगोदर ‘मुन्नभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या नावाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे सह-निर्माता असून, रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, संजय दत्तच्या जवळच्या सुत्रांनी चित्रपटाची बोलणी प्राथमिक अवस्थेत असल्याचे सांगत याबाबत इतक्यात काही बोलण्यास नकार दिला. १९९३ च्या मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला संजय दत्त पुण्याच्या येरवडा कारागृहात मे २०१३ पासून पाच वर्षाची शिक्षा भोगत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा