बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले असून, हे या चित्रपटाचे तिसरे पोस्टर आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये बँडवाल्याच्या पोशाखात दिसलेला आमिर नवीन पोस्टरमध्ये पोलिसाच्या गणवेशात नजरेस पडतो. पोलिसाचा ढगळा गणवेश परिधान केलेल्या आमिरचे डोक्यावर टोपी, खांद्यावर दोन स्टार आणि हातात ट्रान्झिसटर असे सावधान मुद्रेतील रूप पाहायला मिळते. पीकेचे हे पोस्टर त्याने ट्विटरवर प्रसिद्ध केले असून, सोबत भोजपुरी भाषेतील मजेशीर ट्विट्सदेखील पोस्ट केली आहेत.

 

यातील मोशन पोस्टरप्रकारात सुरुवातीला बँडवाल्याच्या वेषातील संजय दत्त आपल्या समोर येतो. मोशन पोस्टरमध्ये आमिरचा आवाजदेखील ऐकू येतो. तो म्हणतो, “फिर टूकुर-टूकुर देखत हो। कनफ्यूजिया गए। अरे, इ हम नई हूं। इ हमरा फेरेंड है भैरो सिंह। तनिक वेट करो, हम आ रहा हूं।”

Story img Loader