‘बाबा’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला असून त्याची प्रेक्षक-समीक्षकांकडून स्तुती होत आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाची सजग आणि मार्मिक अशी हाताळणी यामुळे चित्रपट सर्वत्र गाजत आहे. या चित्रपटाला लोकांची वाहवा मिळत असतानाच संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज २०२०’मध्ये दाखवला जाणार आहे. ‘बेस्ट मोशन पिक्चर्स’मध्ये परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये त्याचे प्रदर्शन होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाबा’ची निर्मिती मान्यता दत्त यांच्या नेतृत्वाखालील ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि अशोक व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’तर्फे होत आहे. हा चित्रपट राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा : अखेर सनी लिओनीने मागितली त्या तरुणाची माफी

या चित्रपटाच्या निर्माती मान्यता दत्त म्हणाल्या, “आम्हांला अभिमान वाटतो की आमची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ गोल्डन ग्लोब्जमध्ये दाखवला जाणार आहे. आमचा यापुढे अर्थपूर्ण आणि तरीही मनोरंजन करणारे चित्रपट निर्मितीचा मानस आहे. ‘बाबा’ हा त्याच पठडीतील चित्रपट आहे. मला पूर्ण आशा आहे की या चित्रपटाला प्रेक्षकांची साथ आणि त्यांचे प्रेम मिळेल.”

‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार यांनी ‘बाबा’ या चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज’साठी झाल्याबद्दल आनंद आणि उत्कंठा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt first marathi movie baba will be shown in golden globes ssv