येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त शिक्षेच्या दीड वर्षांच्या काळात संचित (पॅरोल) आणि अभिवाचन (फलरे) रजेवर सुमारे चार महिने (११८ दिवस) कारागृहाबाहेरच आहे. आता पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याला फलरे रजा मंजूर झाली. मात्र रजा नियमाप्रमाणेच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मंगळवारी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली आहे. दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील १८ महिने शिक्षा त्याने यापूर्वी भोगली आहे. २१ मे २०१३ पासून दत्त येरवडा कारागृहात आहे. या काळात त्याने स्वत:च्या पायाचे दुखणे, पत्नीचे आजारपण अशी कारणे देत रजा मिळवली. त्यात मुदतवाढ घेतली.

Story img Loader