अभिनेता संजय दत्तचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोवरून आता सोशल मीडियावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तानसोबतचे भारताचे संबंध सध्या काहीसे तणावपूर्ण आहेत. तिथल्या कलाकारांसोबत काम करण्यावरूनही सध्या वाद होत आहेत. अशा परिस्थितीत संजय दत्तने मुशर्रफ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत आहेत. संजय दत्तच्या या व्हायरल फोटोमध्ये तो परवेझ मुशर्रफ यांना भेटताना दिसत आहे. दोघांची ही भेट दुबईत झाली. हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी संजय दत्त आणि मुशर्रफ यांची भेट जिममध्ये झाल्याचं म्हटलं आहे.
काहींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. काहींना वाटतं की, त्यांची सहज भेट झाली असावी. परवेझ मुशर्रफ सध्या दुबईत राहतात. फोटोमध्ये ते व्हीलचेअरवर बसले आहेत. तिथेच संजय दत्त कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. एका यूजरनं लिहिलंय – हुकूमशहा जनरल मुशर्रफ संजय दत्तसोबत हँग आउट करत आहेत. काय चालू आहे? एका व्यक्तीनं लिहिलंय – कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय करत आहे? संजयला ड्रग्ज, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतात.