बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. संजयचे आयुष्य वादांनी भरलेले आहे. मादक पदार्थांचे व्यसन, अनेक अफेअर्स, तीन लग्न ते मुंबई बॉम्ब स्फोटांमध्ये सामील असे पर्यंत संजयवर अनेक आरोप होते. या सगळ्या आरोपांमुळे त्याने अनेक वर्षे तुंरुगात काढली. नुकतीच संजय दत्तने ‘सुपर डान्सर ४’ या शो मध्ये हजेरी लावली होती यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत.

शोमध्ये चित्रपटनिर्माता अनुराग बासु यांनी संजयला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी विचारल्या. ‘आमच्या आई-वडिलांनी आम्हाला फक्त एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे नेहमी मोठ्यांचा आदर करा. लहान मुलांवर प्रेम करा,’ असे संजयने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

आणखी वाचा : ‘तुम्ही दोघांनी मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत’, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलियाचं केलं कौतुक

पुढे संजय दत्तने त्याच्या कॉलेजच्या दिवसांची एक आठवण सांगितली, ‘माझी शाळा पूर्ण झाली होती आणि मी कॉलेजला गेलो होतो. तर मला वाटलं की बाबा बोलतील माझ्या मुलाला गाडीने सोडून या. पहिल्याच दिवशी त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलावले. मी म्हणालो हा बाबा बोला, हा सेकेंड क्लासचा रेल्वेचा पास आहे. टॅक्सी, रिक्षा किंवा पायी चालत वांद्रे स्टेशनला जा. वांद्रेहून ट्रेनने चर्चगेट, असे बाबा मला म्हणाले. तर हे संस्कार आम्हाला दिले.’ संजय दत्त मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये होता आणि स्टेशनपासून त्याच्या कॉलेजपर्यंत तो चालत जायचा.

आणखी वाचा : गणेशोत्सवात अबरामचा गणपती बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे शाहरूख झाला होता ट्रोल

लवकर संजय दत्त ‘शमशेर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच संजय दत्त ‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader