‘मुन्नाभाई…’ चित्रपटातील अभिनेता संजय दत्त आपल्या कारकिर्दीचे दुसरे पर्व नक्कीच गाजवेल असा विश्वास दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केला आहे. तो परत आल्यामुळे आम्ही सर्व खूप आनंदीत आहोत. तसेच खुद्द संजयसुद्धा आपल्या अभिनय कारकिर्दीच्या दुसऱ्या पर्वासीठी ऊत्सुक असल्याचे हिरानींनी सांगितले.
राजकुमार हिरानींनी ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे चित्रपट दिग्दर्शित केले असून, लवकरच ते ‘मुन्नाभाई ३’च्या चित्रिकरणास सुरूवात करणार आहेत.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची गुरूवारी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या येरवाडा कारागृहातून कायमची सुटका झाली. एकूण ४२ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर त्याची आज सुटका करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-02-2016 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt will rock in second innings munnabhai director rajkumar hirani