सध्या संजय दत्त त्याचा आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमातून संजय कमबॅक करत असल्यामुळे प्रमोशनमध्ये त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवायची नाहीये. पण ही तर झाली आत्ताची गोष्ट, भूमी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केल्यापासूनच संजयकडे अनेक सिनेमांचे प्रस्ताव येऊ लागले होते. अनेक नावाजलेले दिग्दर्शक त्याला आपल्या सिनेमात घेण्यासाठी उत्सुक आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवोदित दिग्दर्शक आरंभ कुमार याला त्याच्या ‘मलंग’ या पहिल्या सिनेमात संजय दत्तला घेण्याची इच्छा आहे. फक्त संजयच नाही तर राणी मुखर्जीनेही सिनेमात काम करावे, अशी आरंभ कुमारची इच्छा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अमिताभ तुम्ही काहीही करु नका, फक्त गप्पा मारा’- शबाना आझमी

मलंग सिनेमाचे सह-निर्माते संदीप कुमार यांनी सांगितलं की, ‘आम्ही या सिनेमातील नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी राणीला विचारले आहे. आमच्या प्रत्येक सिनेमात राणी असावी असेच मला वाटते. कारण राणीसारखी अभिनेत्री सिनेसृष्टीत मिळणं फार कठीण आहे. संजयसोबत तिची जोडी फार उठून दिसेल.’ मात्र, राणीने अजूनही या सिनेमात काम करण्यासाठी होकार दिलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना संजय आणि राणीची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

संजय दत्तच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ‘भूमी’ सिनेमानंतर तो ‘वह द गुड महाराजा’ या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपासून संजयचा राजेशाही थाटातला एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.