बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची जेष्ठ कन्या त्रिशाला सध्या तरी बॉलिवूडमध्ये येण्याच्या कोणत्या ही तयारीमध्ये नाही.
संजय दत्त व १९९६मध्ये ‘ब्रेनट्यूमर’मुळे मृत्यू झालेली त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांचे त्रिशाला पहिले आपत्य. त्रिशाला सध्या अमेरिकेमध्ये तीच्या आजी-आजोबांसोबत राहात आहे. बॉलिवूड पेक्षा फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्रिशाला रस घेत आहे.
मला बॉलिवूडमध्ये रस नसल्यामुळे मी बॉलिवूड पासून लांब राहणे पसंत करते. मी माझे स्वत:चे फॅशन क्षेत्रातील फर्म सुरू करत असल्याचे टि्वटरवर मित्रांशी संवादसाधत त्रिशाला म्हणाली.
म्हणजेच त्रिशाला इतर स्टार पुत्र-कन्यांप्रमाणे घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे घेवून जाणार नसल्याचे सिध्द झाले आहे. त्रिशालाचे अभिनेते वडिल संजय दत्त याने त्याचा आई-वडिलांचा, नर्गिस व सुनिल दत्त यांच्या अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवला. मात्र, त्रिशाला तीच्या पित्याचा वारसा पुढे घेवून जाणार नाही असेच सध्या दिसत आहे. या आधी त्रिशालाच्या बॉलिवूड पदार्पनाच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, संजय दत्तची २५ वर्षीय कन्या त्रिशालाने ब्लॉगवर तीने आता बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय बदलला असल्याचे पोस्ट केले आहे.
“थोडा आडमुठा निर्णय आहे. परंतू, मी आता बॉलिवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी अद्याप लहान होते. आता माझ्यात विचार करण्याची क्षमता वाढली आहे. मला बऱ्याच गोष्टींशी संघर्ष करावा लागला आहे. आता मला काय करायचे आहे ते मला समजले आहे,” असे त्रिशालाने ब्लॉगवर पोस्ट केले आहे.
त्रिशालाचे ‘ड्रिम ट्रेसेस हेअर एक्सटेंशन’ हे फॅशन फर्म या वर्षाच्या शेवटी सुरू होत आहे.
संजय दत्तची कन्या त्रिशाला म्हणते बॉलिवूडमध्ये रस नाही
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची जेष्ठ कन्या त्रिशाला सध्या तरी बॉलिवूडमध्ये येण्याच्या कोणत्याही तयारीमध्ये नाही
आणखी वाचा
First published on: 23-10-2013 at 03:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutts daughter trishala has no plans to join bollywood