अभिनेता संजय दत्त हा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला काही दिवसांपूर्वी पॅरोलवर रजा मंजूर करण्यात आली होती. पॅरोलच्या रजेवर तुरूंगाबाहेर असताना संजय दत्तने बॉलीवूडमधील काही व्यक्तींच्या आणि कुटुंबांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी संजय दत्त करत असलेल्या मौजमजेचा प्रकार ‘एमएमएस क्लिप’ च्या माध्यमातून उघडकीस आल्यामुळे आता नवा वाद उद्भवला आहे. संजय दत्तने त्याची पत्नी मान्यता हिच्या आजारपणासाठी सुट्टी मिळावी असा अर्ज केला होता. प्रत्यक्षात मात्र संजय दत्तकडून या रजेचा उपयोग खाजगी जीवनातील मौजमजेसाठी होत असल्याचा प्रकार या ‘एमएमएस क्लिप’च्या माध्यमातून उघडकीस आला आहे. या क्लिपमध्ये संजय दत्तला भेटण्यासाठी आलेल्या चित्रपटसृष्टीतील एका कुटुंबाच्या सदस्याकडून ही ‘एमएमएस क्लिप’ चित्रित केली गेली. ही क्लिप त्याने आपल्या काही जवळच्या मित्रांना पाठविली होती. त्यानंतर या जवळच्या मित्रांनी ही क्लिप आणखी काही मित्रांना पाठविली. अशाप्रकारे ही ‘एमएमएस क्लिप’ पसरत गेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या क्लिपमध्ये चित्रित करण्यात आलेल्या दृश्यांमध्ये संजय दत्त मद्यपान करताना दिसतो. तसेच मद्याच्या नशेत असणारा संजय दत्त यावेळी चित्रपटसृष्टीतील काही जणांची टिंगलटवाळी करताना दिसून आला आहे. त्यामुळे आता हा प्रकार चित्रित करणा-या आणि ही क्लिप बाहेर पसरवाणा-या व्यक्तीचा शोध संजय दत्तचे कुटुंबीय घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एमएमएस क्लिप’मुळे संजय दत्त पुन्हा वादाच्या भोव-यात
अभिनेता संजय दत्त हा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला काही दिवसांपूर्वी पॅरोलवर रजा मंजूर करण्यात आली होती.
आणखी वाचा
First published on: 17-04-2014 at 05:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutts mms clip leaked