बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा सचदेव यांच्या ग्लॅमरस आयुष्याची झलक दाखवणाऱ्या या शोचा पहिला सीझनही खूप गाजला होता. पहिल्या सीझनमध्ये चार स्टार पत्नींनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बरेच धक्कादायक खुलासे केले होते. दुसरा सीझनही असाच काहीसा असणार आहे. दुसऱ्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये, महीप कपूरने पती संजय कपूरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
महीप कपूरने या शोमध्ये, संजय कपूरने २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिची फसवणूक केल्याचं आणि लग्नानंतरही संजयचं दुसऱ्या स्त्रीशी अफेअर असल्याचं तिने म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा खुलासा करण्यापूर्वी महीप कपूरने संजयला याबाबत काहीही सांगितले नाही. महीप कपूरने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना याबद्दल भाष्य केलं. त्याचबरोबर महीप कपूरने शोमध्ये सर्वांसमोर या गोष्टीबद्दल सांगणे तिच्यासाठी कठीण आहे का? आणि तिने याबद्दल घरच्यांना सांगितले का? अशा प्रश्नांची उत्तरंही दिली.
आणखी वाचा- ‘स्वातंत्रवीर सावरकर’साठी रणदीप हुड्डाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, नवा लूक पाहिलात का?
महीप कपूर म्हणाली, ‘यात कठीण वाटवं असं काहीच नव्हतं. हे सहज घडलं. त्यावेळी आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि मी बोलता बोलता त्या गोष्टीचा खुलासा केला. या शोमध्ये आम्ही आमची खरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की स्त्रिया समजून घेतील की सर्व काही दिसतं तेवढं गोंडस आणि सुंदर नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात आणि आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो. आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे असे नाही. तुम्हाला दिसेल की प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. त्यामुळे त्याबद्दल बोलणं खूप गरजेचं होतं.
आणखी वाचा- महिप कपूर यांनी शेअर केला मिस इंडिया स्पर्धेचा तो व्हिडीओ, मलायका अरोरा म्हणाली…
महीप कपूर म्हणाली, “संजय कपूरने माझी फसवणुकी केली याबद्दल बोलण्यापूर्वी मी त्याला काहीच सांगितले नाही. त्यालाही या शोमधून कळेल.” संजय कपूर हा अभिनेता अनिल कपूरचा भाऊ असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय कपूरने १९९७ मध्ये महीप कपूरशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. महीप कपूर आणि संजय कपूर यांना एक मुलगा आणि एक मुलगी शनाया कपूर आहे. शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.