संजय लीला भन्साळींच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या तयारीला लागले आहेत. संजय लीला भन्साळींनी नुकतंच नेटफ्लिक्ससोबत त्यांच्या नव्या वेब सीरिजसाठीची डील साइन केलीय. त्यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची नेटफ्लिक्सने नुकतीच घोषणा देखील केलीय. संजय लीला भन्साळी फिल्म इंडस्ट्रीत त्यांची करिअरची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने ते नेटफ्लिक्सवर त्यांची पहिली वहिली वेब सीरिज भेटीला आणत आहेत.
संजय लीला भन्साळींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज एकूण सात एपिसोड्समध्ये दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची कथा दाखवण्यात येणार आहे. तसंच यातील कथा ही हीरामंडी सेक्स वर्कर्सच्या कहाणीशी संबंधित असल्याचं देखील बोललं जातंय. सोबतच भारतातल्या हीरामंडी जिल्ह्याची सांस्कृतिक वास्तविकता सुद्धा या वेब सीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. संजय लीला भन्साळींच्या या ग्रॅण्ड प्रोजेक्टमध्ये राजकारण, प्रेम आणि विश्वासघात या भावनांचं दर्शन घडवणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट हे भव्य सेट, रंग-बिरंगे वेशभूषा आणि पात्रांसाठी ओळखले जातात. अगदी त्याच पद्धतीने त्यांची ही पहिली वेब सीरिज शूट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. संजय लीला भन्साळींनी बॉलिवूडमध्ये त्यांची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या कारकिर्दीत त्यांनी ‘देवदास’, ‘बाजी राव मस्तानी’, ‘गोलियों की रास लीला राम लीला’, ‘ब्लॅक’, ‘गुजारिश’, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटांच्या कथा वेगवेगळ्या असल्या तरी एका गोष्टीचं मात्र साम्य दिसून येतं. संजय लीला भन्साळींचा चित्रपट म्हणजे एखाद्या पेंटिंगप्रमाणे दिसून येतं.
आणखी वाचा: ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोतल्या मीरा कपूरचा ग्लॅमरस अंदाज पाहून फॅन्स घायाळ
संजय लीला भन्सळींचा ‘हीरामंडी’ हा प्रोजेक्ट एक मोठा माइलस्टोन मानला जातोय. या प्रोजेक्टसोबत काही तरी मोठं करण्याचा प्रयत्न संजय लीला भन्साळी करत आहेत. त्यामूळे या प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक असल्याची प्रतिक्रिया संजय लीला भन्साळींनी दिलीय.