संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खान हे एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. ‘खामोशी’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत अनेक चित्रपट या जोडीने केले आहे. पण ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केलेले नाही. मात्र नुकतंच संजय लीला भन्साळी यांनी सलमानसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला मुलाखत दिली. तेव्हा त्यांना सलमान खानबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, “सलमान माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे. पद्मावत चित्रपटानंतर मी प्रयत्न करत होतो. पण माणूस म्हणून आपण सर्वजण काळासोबत बदलतो. सलमानही बदलला आहे आणि त्याच्या मते मीही बदललो आहे.”

“सलमान खान आणि माझे नाते आजही तितकेच चांगले आहे. आमच्या दोघांमध्ये आजही संभाषण होतं. त्यामुळे आमच्यात संवाद नाही, आम्ही अनोळखी आहोत, असे काहीही नाही. माझ्या मनात सलमानबद्दल फार आदर आहे. खामोशी या चित्रपटात त्यांनी माझ्यासाठी काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये त्याने माझ्यासाठी काम केले होते. सावरियाच्या वेळीही तो माझ्या पाठीशी उभा राहिला”, असेही त्यांनी सांगितले.

“त्यामुळे आज मी जो काही आहे. त्यात सलमानचा मोठा वाटा आहे. यासाठी मी त्या नेहमीच ऋणी राहिन. हो…पण आता चेंडू मात्र त्याच्या कोर्टात आहे. भविष्यात त्याला माझ्यासोबत काम करायचे की नाही, हे त्याने ठरवायचे आहे”, असेही संजय लीला भन्साळी म्हणाले.

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या दोघात प्रेम आणि द्वेष असे दोन्हीही प्रकारचे संबंध आहेत. हे दोघेही ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटासाठी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र येणार होते. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रद्द करावा लागला. यामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडल्याचे सांगितलं जातं.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ पाहिलास का? शाहरुख खान म्हणाला, “मला आधी पठाण…”

विशेष म्हणजे १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटामध्ये तो झळकलं होता. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे आजही त्याचा हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी एकदाही एकत्र काम केल्याचं पाहायला मिळालं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay leela bhansali says salman khan is very dear friend but he has changed reveals nrp