पायरसीची किड चित्रपटसृष्टीला पोरखून काढत आहे. पायरसीच्या कचाट्यात बॉलिवूडमधले अनेक चित्रपट सापडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत चित्रपट लीक होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ‘उडता पंजाब’, ‘कबाली’, ‘काला’ ‘२.०’, ‘संजू’, ‘रेस ३’, ‘पद्मावत’, ‘झिरो’ सारख्या अनेक चित्रपटांना पायरसीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र पायरसीची ही किड ‘ठाकरे’ चित्रपटाला लागू देणार नाही असा इशाराच जणू चित्रपटाचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

‘ठाकरे’ चित्रपटाची पायरसी रोखण्यासाठी आधिच उपाययोजना करण्यात आल्या आहे. या चित्रपटाची पायरसी रोखण्यासाठी पुरेपुरे खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटाची पायरसी करण्याची कोणामध्ये हिम्मत आहे ते पाहूच अशा कडक शब्दात पायरसी करणाऱ्यांना संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘ठाकरे’ चित्रपटाची पायरसी रोखण्यासाठी आधीच खबरदारी घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. येत्या २५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत देशभरात प्रदर्शित होत आहे.

सध्या ‘तामिळ रॉकर्स’ या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वेबसाईटवरून सर्वाधिक पायरसी होत आहे. गेल्यावर्षी २.० च्या प्रदर्शनाच्यावेळी ‘तामिळ रॉकर्स’च्या जवळपास ३ हजार मायक्रोसाइट्सवर मद्रास हायकोर्टानं बंदी घातली होती असं असूनही हा चित्रपट लीक झाला होता. त्यामुळे ‘ठाकरे’ सारख्या मोठ्या चित्रपटाची पायरसी रोखण्याचं मोठं आव्हान आता चित्रपटाच्या टीमसमोर असणार आहे.

Story img Loader