Sanju Rathod Kaali Bindi Song : ‘गुलाबी साडी’ या गाण्याचा उल्लेख जरी केला तरी, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर याचा मूळ गायक संजू राठोडचं नाव येतं. संजूच्या ‘गुलाबी साडी’ने भल्या-भल्यांना वेड लावलं. अगदी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते परदेशातील किली पॉलपर्यंत सर्वत्र हे गाणं लोकप्रिय झालं होतं. मराठी कलाविश्वातील असंख्य सेलिब्रिटींनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं होतं. या ‘गुलाबी साडी’च्या लोकप्रियतेच्या जोरावर संजूने गेल्या काही महिन्यांमध्ये टेलिव्हिजनवरच्या बऱ्याच शोमध्ये परफॉर्मन्स सादर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’ या गाण्यांनंतर संजू ( Sanju Rathod ) नवीन काय करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अखेर संजूचं नवीन गाणं आठवड्याभरापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याचं नाव आहे ‘काळी बिंदी’. या गाण्याची कथा खूपच हृदयस्पर्शी आहे. छोट्या खेडेगावातील एका जोडप्याची काल्पनिक कथा या गाण्याच्या माध्यमातून संजूने मांडली आहे.

हेही वाचा : Video : मुंबईचा जावई अन् पुण्याची सून! सेलिब्रिटी जोडप्याच्या लग्नाची ‘सहामाही’, अभिनेत्री म्हणते, “लग्नाच्या परीक्षेत येणारे प्रश्न…”

प्रमुख भूमिकेतली अभिनेत्री कोण आहे?

नवरा आपल्या बायकोचं करिअर घडावं यासाठी मनापासून प्रयत्न करत असतो. त्याची बायको सुद्धा घरातलं सगळं काम करून रात्रंदिवस अभ्यासासाठी मेहनत करते. अखेर परीक्षा पास होऊन ती मोठं यश मिळवते. पत्नीला पोलीस अधिकारी झालेलं पाहून नवऱ्याचे डोळे पाणावतात. गाण्यात नवऱ्याची भूमिका स्वत: संजू राठोडने तर, त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका आकृति नेगीने साकारली आहे.

‘काळी बिंदी’ गाण्यात झळकलेली आकृति नेगी ही स्प्लिट्सव्हिलाच्या ( Splitsvilla ) १५ व्या पर्वाची विजेती आहे. तिचा निरागसपणा आणि सुंदर डान्स संपूर्ण गाण्यात लक्ष वेधून घेतो. हे गाणं स्वत: संजूने ( Sanju Rathod ) लिहून त्यानेच कंपोझ देखील केलं आहे.

हेही वाचा : Salman Khan – “बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”

संजूच्या ( Sanju Rathod ) ‘काळी बिंदी’ ( Kaali Bindi ) गाण्याला एका आठवड्यात युट्यूबवर आतापर्यंत ७.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर सुद्धा ट्रेंड होत आहे. नेटकऱ्यांनी या नव्या गाण्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय ‘गुलाबी साडी’प्रमाणे या ‘काळी बिंदी’ गाण्यावर सुद्धा सोशल मीडिया स्टार्स व सेलिब्रिटींनी हळुहळू व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju rathod kaali bindi new song after gulabi sadi massive success featuring this actress sva 00