अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. संकर्षणच्या या विनोदी नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ नाटकात संकर्षसह अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे आहे. नुकताच या नाटकाचा कतार दौरा झाला. कतारमधील मराठी रसिक प्रेक्षकांनी ‘नियम व अटी लागू’ नाटकाला उदंड प्रतिसाद दिला. यासंदर्भात नुकतीच संकर्षणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकर्षण कऱ्हाडेचा कतार दौऱ्यावरील अनुभव…

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने कतारमधील प्रयोगाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्याने कतार दौऱ्याचा अनुभव सांगत लिहिलं आहे, “नमस्कार, अहो ‘परभणीच्या काद्राबाद’ एरियात राहायचो तेव्हा कधीही वाटलं नव्हतं की ‘कतार’मध्ये हाउसफुल्ल प्रयोग करायची संधी मिळेल. जवळपास ८०० लोकांनी भरलेलं ते सभागृह, प्रयोगानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि पाणीपुरीच्या खमंग प्लेटनंतर सूकी पूरी मागावी तशी नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी केलेली कवितेची फर्माईश…माशा अल्लाह…काय मज्जा आली…”

हेही वाचा – घनःश्याम दरवडेला ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्यासाठी कुटुंबाने दिला होता नकार, मोठ्या बहिणीने सांगितलं कारण, म्हणाली…

पुढे संकर्षणने लिहिलं की, मराठी माणसांना, रसिक प्रेक्षकांना जगात तोड नाही…कतार मराठी मंडळाने केलेलं आउटसॅडिंग, उत्तम नियोजन…येताना एअर इंडियाच्या विमानात बसलो तर केबिन क्रू इनचार्ज अनघा मॅडम होत्या…त्यांनी ओळखलं, विशेष काळजी घेतली, गिफ्ट दिलं…असा सगळा दौरा सुफल संपन्नं झाला…आता हे सगळं वाचून तुम्ही पोस्टवर कमेंट करून पुढच्या प्रयोगाला आलात की अजून दुसरं काय पाहिजे…उद्या २२ सप्टेंबर रविवारी दूपारी ४.३० वाजता डोंबिवलीत नियम व अटी लागू.

हेही वाचा – Video: “नजर साफ असेल तर…”, प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा

हेही वाचा – Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई आणि पत्नी, ‘बिग बॉस’ना सुचवला एक नवा टास्क

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. “एक नंबर”, “तू लय भारी आहे”, “खूप छान”, “खूप भारी अनुभव होता”, “ग्रेट”, “तू लकी आहेस”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या प्रतिक्रिया संकर्षणच्या पोस्टवर उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankarshan karhade niyam v ati lagoo drama housefull in qatar pps