मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर त्याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. अनेकदा तो त्याच्या कामाचे अपडेट आणि फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना दिसतो. अनेकदा तो त्याच्या कविताही इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. पण आता त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनची चर्चा होताना दिसत आहे. संकर्षणची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर लंडनमधील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याला त्याने दिलेलं कॅप्शन सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. संकर्षणने लिहिलं, “काल पहाटे लंडनसाठी निघालो.. सुखरूप पोचलो.. का आलोय.. काय करणारे… लवकरच सांगतो.. पण शुभेच्छा असू द्या.” संकर्षणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याच्या या पोस्टवरून वेगवेगळे अंदाज बांधताना दिसत आहेत.
आणखी वाचा- “मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

विशेष म्हणजे संकर्षणच्या या लंडन दौऱ्यात त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीही आहे. तिनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संकर्षणसह एक फोटो शेअर करत “माझ्या मित्रासह लंडनला जाण्यासाठी तयार.” असं कॅप्शन दिलं होतं. मात्र हे दोघंही लंडनला कशासाठी गेले आहेत याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण आगामी काळात चाहत्यांना या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील.

आणखी वाचा- ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दीपिकासह रणवीरही दिसणार? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

दरम्यान गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील त्याने साकारलेली समीर ही भूमिका खूपच गाजली. अलीकडेच या मालिकेतील त्याचा शेवटचा सीन त्याने शूट केला. मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर त्याने अलिकडेच एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती.