अभिनेता संकर्षण कऱ्हाडे संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. कधी तो आपल्या चित्रपटामुळे, कधी आपल्या कवितांमुळे तर वेगळ्या धाटणीच्या नाटकामुळे तो चर्चेचा भाग असतो. आता त्याने एका मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्यातील करिअर आणि कुटुंबाविषयी काही आठवणी सांगितल्या आहेत.

‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनेलने काही दिवसांपूर्वी संकर्षण कऱ्हाडेची मुलाखत घेतली होती. आता त्या मुलाखतीतील काही महत्त्वाचा भाग ‘व्हायफळ हाइलाईट’ दरम्यान पुन्हा एकदा प्रदर्शित केला आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या आई-वडिलांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
4th September Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ सप्टेंबर पंचांग: बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणाला होईल लाभ? अडकलेले पैसे मिळतील तर ‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव
father-in-law, extraordinary personality,
माझे सासरे : एक असाधारण व्यक्तिमत्त्व
Minor Girl Died on Rakshabandhan
Rakshabandhan : भावांना राखी बांधली अन् बहिणीने सोडले प्राण; एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीची करूण कहाणी!
Mercury transit of Kanya rashi create Bhadra Rajyoga
भद्र राजयोग देणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
only child, parenting, parents, child,
दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!
vinesh phogat reader comment
लोकमानस: पदकांचा दुष्काळ पडतो, कारण…
The President of Yuva Sangharsh Morcha in Deoli Kiran Thackeray protested till the Tehsil office regarding farmers issue wardha
अबब! युवकाचे सव्वा किलोमीटर लोटांगण, बघ्यांची गर्दी अन्…

आपल्या आई-वडिलांविषयी एक भावूक आठवण सांगताना संकर्षण म्हणतो की, त्यावेळी मी ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकात प्रशांत दामलेंबरोबर काम करायचो, एकेदिवशी माझं सकाळी ८ वाजता ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाचं शूट होतं आणि रात्री साडे आठला काशिनाथ घाणेकरचा प्रयोग होता. त्यावेळी माझ्या अंगात ताप भरला होता आणि तो १०३ डिग्री सेल्सिअसच्या पुढे जायला लागला. त्यामुळे चारऐवजी दोन एपिसोडचं शूटिंग केल्यानंतर मला त्यांनी लवकर सोडलं. सकाळी शूटिंगला जाताना मी बाबांना फोन केला होता, त्यावेळी त्यांना ताप आल्याचं सांगितलं होतं. कदाचित शूटिंग अर्ध रद्द करेन आणि प्रयोगाला जाईन असं त्यांना म्हटलं होतं, कारण प्रयोग तर रद्द करू शकत नव्हतो; कारण बुकिंग वगैरे झालं होतं.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं अरेंज मॅरेज, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डिलीट केले पतीबरोबरचे फोटो; नेमकं काय घडलं?

पुढे तो सांगतो की, साडेआठला काशिनाथ घाणेकरला प्रयोग सुरू झाला होता. ताप वाढल्याने माझ्या अंगात त्राण नव्हते, पहिला अंक संपल्यानंतर मी विंगेत आलो आणि समोर बाबा उभे होते. मी त्यांच्याकडे बघितलं आणि मला घळाघळा रडायला आलं. मी सकाळी फोन केल्यानंतर त्यांनी आईला पोळी भाजी करायला सांगितली, ११ च्या तपोवन एक्स्प्रेसला बसले. परभणीहून १० तासांचा ५०० किलोमीटर लांब प्रवास करून माझ्यासाठी घरचा डबा घेऊन ते पोहोचले होते. दिवसभर तापामुळे माझ्या पोटात काहीसुद्धा नव्हतं. बाबा आल्यानंतर त्या मध्यांतरामध्ये मी आईच्या हातच्या चार पोळ्या आणि भाजी पोटभर खाल्ली आणि दुसरा अंक खणखणीत केला. अशी आठवण सांगत असताना आपली माणसं आपल्यासाठी आपल्या आजूबाजूला असतात. पुढे बोलताना तो म्हणतो, “माझ्या डोळ्यासमोर आजही ते चित्र उभं आहे. काशिनाथ घाणेकरच्या त्या विंगेत बाबा दोन हातात दोन पिशव्या घेऊन उभे आहेत. हे आपल्या आई-वडिलांशिवाय आपल्यासाठी कोणीच करू शकत नाही. माझ्या बाबांनी मला कायम एकच गोष्ट शिकवली की, कायम तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा आणि म्हणूनच मी कायम माझ्या कामाशी भयंकर प्रामाणिक असतो, असे संकर्षणने या मुलाखतीत म्हटले आहे.