मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. संस्कृती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी संस्कृती बालगुडे सध्या तिच्या फोटोवर एका चाहत्यानं केलेल्या कमेंटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या बरीच व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संस्कृती बालगुडेनं नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं असून याचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगांच्या सुंदर अनारकली ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. तिचा हा लूक सर्वांनाच आवडला असून विशेषतः तिच्या हास्यावर चाहते घायाळ झाले आहेत. संस्कृतीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

आणखी वाचा- “ती माझी खरी मुलगी नाही….” अनुषा दांडेकरची पोस्ट चर्चेत, पण मग ‘ती’ आहे तरी कोण?

संस्कृतीच्या फोटोवर कमेंट करताना अनेकांनी तिच्या हास्याचं आणि गालावर पडणाऱ्या खळीचं कौतुक केलं आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, “अशाप्रकारे आपल्या सुंदर अदांनी लोकांना घायाळ करणं बेकायदेशीर आहे.” इतर कोणत्याही लुकपेक्षा चेहऱ्यावर निखळ हास्य असलेला संस्कृतीचा हा लुक भलताच पसंत केला जात आहे.