मनोरंजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्कार. गेली १९ वर्ष सातत्याने चित्रपट, नाटक, मालिका आणि या साऱ्या विभागांना वेळोवेळी यथोचित प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना ‘संस्कृती कला दर्पण’ पुरस्काराने गौरवण्यात येते. अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत १९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९’ च्या नामांकनांसाठी मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या चुरस चाललेली असून नुकताच हा नामांकन सोहळा अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ‘संस्कृती कलादर्पण’च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी नामांकन यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यंदाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री ‘रोहिणी हट्टंगडी’ यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार दिनांक ११ मे रोजी कमालीस्थान स्टुडियोमध्ये सायं. ६.३० वा. रंगणाऱ्या १९ व्या ‘संस्कृती कला दर्पण गौरव रजनी’ पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात येईल.

चित्रपट विभागाच्या परिक्षणाची जबाबदारी निर्मात्या-दिग्दर्शिका समृद्धी पोरे, अभिनेत्री अदिती देशपांडे, दिग्दर्शक अमोल शेडगे, ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर आणि लीना नांदगांवकर यांनी सांभाळली आहे. तर नाटक विभागासाठी ज्येष्ठ कलाकार-दिग्दर्शक विजय गोखले, दिग्दर्शिका रोहिणी निनावे, कलाकार-दिग्दर्शक प्रमोद पवार, गुरुदत्त लाड, मालिका विभागांसाठी कल्पना सावंत, रेखा सहाय्य, नितीन कुमार आणि न्यूज चॅनेल्सच्या नामांकनांची जबाबदारी ‘संस्कृती कलादर्पण’च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांभाळली आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Jitendra Awhad
Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत
Nair Hospital Dental College received prestigious Pierre Fauchard Academy award for societal contribution
नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा अमेरिकास्थित ‘पिएर फॉचर्ड अकॅडमी’तर्फे सन्मान!
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Celebrations in Baramati after Ajit Pawar becomes Deputy Chief Minister Pune news
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीमध्ये जल्लोष
Kolhapurs short film Deshkari highlighting farmers and soldiers won Filmfare OTT and Jury Awards
कोल्हापुरातील देशकरी लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार
devendra fadnavis nitin gadkari
फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”

चित्रपट विभाग

१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दिगपाल लांजेकर (फर्जंद), रवी जाधव (न्यूड), प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न), आदिनाथ कोठारे (पाणी), अभिजित देशपांडे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर)

२. सर्वोत्कृष्ट कथा – पाणी (आदिनाथ कोठारे), चुंबक (संदीप मोदी), न्यूड (रवी जाधव-सचिन कुंडलकर), माधुरी (शिरीष लाटकर), बकेट लिस्ट (तेजस प्रभा-विजय देऊसकर)

३. सर्वोत्कृष्ट पटकथा – मुळशी पॅटर्न (प्रवीण तरडे), आपला माणूस (विवेक बेळे), रणांगण (शिरीष लाटकर), एक सांगायचंय! (लोकेश गुप्ते), आणि डॉ. काशिनाथ घाणेकर (अभिजित देशपांडे)

४. सर्वोत्कृष्ट संवाद – आणि डॉ. काशिनाथ घाणेकर (अभिजित देशपांडे – गुरु ठाकूर), आपला माणूस (विवेक बेळे), मुंबई पुणे मुंबई ३ (अश्विनी शेंडे), मुळशी पॅटर्न (प्रवीण तरडे), भाग्यश्री जाधव (आम्ही दोघी)

५. सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुबोध भावे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), आदिनाथ कोठारे (पाणी), ओम भुतकर (मुळशी पॅटर्न), सुमित राघवन (आपला माणूस), स्वप्निल जोशी (रणांगण)

६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रिया बापट (आम्ही दोघी), माधुरी दीक्षित (बकेट लिस्ट), कल्याणी मुळ्ये (न्यूड), सोनाली कुलकर्णी (गुलाबजाम), इरावती हर्षे (आपला माणूस)

७. सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेता – मोहन जोशी (मुळशी पॅटर्न), स्वानंद किरकिरे (चुंबक), प्रसाद ओक (फर्जंद), सिद्धार्थ चांदेकर (गुलाबजाम), के.के.मेनन (एक सांगायचंय!)

८. सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री – स्पृहा जोशी (होम स्वीट होम), पल्लवी पाटील (सविता दामोदर परांजपे), सविता मालपेकर (मुळशी पॅटर्न), स्मिता तांबे (ट्रकभर स्वप्नं), छाया कदम (न्यूड)

९. सर्वोत्कृष्ट संकलन – निलेश गावंड (मस्का), राहुल भातणकर (आपला माणूस), मयूर हरदास (मुळशी पॅटर्न)

१०. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक – संतोष फुटाणे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), सुधीर तारकार (मेनका उर्वशी), बोला अलख निरंजन (देवदास भंडारे – दिपक साळुंखे)

११. सर्वोत्कृष्ट छायांकन – अमलेंदू चौधरी (न्यूड), महेश लिमये (मुळशी पॅटर्न), प्रसाद भेंडे (सविता दामोदर परांजपे)

१२. सर्वोत्कृष्ट गीतरचना – मनोज यादव – आदिनाथ कोठारे (पाणी), सायली खरे (न्यूड), वैभव जोशी (सविता दामोदर परांजपे)

१३. सर्वोत्कृष्ट संगीत – राजेश सरकटे (मेनका उर्वशी), साई-पियुष – (लग्न मुबारक), चिनार-महेश – (मस्का)

१४. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – निशा तोलिया (किती जन्म – सविता दामोदर परांजपे), सायली खरे (दिस येती दिस जाती – न्यूड), वैशाली माडे (कोणते नाते म्हणू हे – आम्ही दोघी)

१५. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – जयतीर्थ मेऊंडी (विठ्ठला – पुष्पक विमान), सौरभ साळुंखे( आभाळा आभाळा – मुळशी पॅटर्न), अवधूत गुप्ते (ए बाबा – एक सांगायचंय!)

१६. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), अनिल गिरकर (माझा अगडबम), सचिन देठे (फर्जंद)

१७. लक्षवेधी अभिनेत्री (घोषित) – प्रीतम कागणे (अहिल्या एक झुंज)

१८. प्रथम पदार्पण कलाकार – अंकित मोहन (फर्जंद), साईंकित कामत (मिरांडा हाऊस), तृप्ती तोरडमल (सविता दामोदर परांजपे), प्रणाली घोगरे (रणांगण), गौरी किरण (पुष्पक विमान)

१९. सामाजिक चित्रपट – अहिल्या एक झुंज (शिरीष क्रिएशन्स), महाराजा (चंद्रभागा प्रोडक्शन्स), भोंगा (नलिनी प्रोडक्शन्स)

२०. विशेष ज्युरी पुरस्कार (घोषित) – पाणी (पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन)

२१. सर्वोत्कृष्ट चित्रपट- फर्जंद (स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी), मुळशी पॅटर्न (अभिजित भोसले जेन्युईन प्रोडक्शन्स एल.एल.पी), न्यूड (अथांश कम्युनिकेशन अँड झी स्टुडियोज), सविता दामोदर परांजपे (जे. ए. एंटरटेनमेंट प्रा. लि.), आणि डॉ. काशिनाथ घाणेकर (श्री. गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स)

२२. विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शन (घोषित) – प्रमोद पवार (ट्रकभर स्वप्नं)

२३. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट (घोषित) – सविता दामोदर परांजपे (जे. ए. एंटरटेनमेंट प्रा. लि.), फर्जंद (स्वामी समर्थ क्रिएशन्स एल.एल.पी), गुलाबजाम (झी स्टुडियोज)

२४. प्रथम पदार्पण दिग्दर्शन – अभिजित देशपांडे (आणि डॉ. काशिनाथ घाणेकर), दिगपाल लांजेकर (फर्जंद), वैभव चिंचाळकर (पुष्पक विमान), लोकेश गुप्ते (एक सांगायचंय!), प्रियदर्शन जाधव (मस्का)

नाटक विभाग

१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर (दादा एक गुड न्यूज आहे), आदित्य इंगळे (सोयरे सकळ), निपुण धर्माधिकारी (वन्स मोअर), मंगेश कदम (गुमनाम है कोई!), हेमंत ऐदलाबादकर – (तिला काही सांगायचंय!)

२. सर्वोत्कृष्ट लेखक- कल्याणी पाठारे (दादा एक गुड न्यूज आहे), समीर कुलकर्णी (सोयरे सकळ), शिरीष लाटकर (खळी), शिल्पा नवलकर (गुमनाम है कोई!), हेमंत ऐदलाबादकर – (तिला काही सांगायचंय!)

३. सर्वोत्कृष्ट अभिनेता – उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे), आस्ताद काळे (तिला काही सांगायचंय!), अविनाश नारकर (सोयरे सकळ), भरत जाधव (वन्स मोअर), ऋषिकेश जोशी (जुगाड)

४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मधुरा वेलणकर- साटम (गुमनाम है कोई!), ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), ऋता दुर्गुळे (दादा एक गुड न्यूज आहे), तेजश्री प्रधान (तिला काही सांगायचंय!), ऋतुजा देशमुख (वन्स मोअर)

५. सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेता – आशुतोष गोखले (सोयरे सकळ), किरण माने (चल तुझी सीट पक्की!), अजय कांबळे (एपिक गडबड)

६. सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री – मनवा नाईक (हॅम्लेट), हेमांगी कवी (ओवी), शैला काणेकर (गुमनाम है कोई!)

७. सर्वोत्कृष्ट प्रकाश – एपिक गडबड (अमोघ फडके), आरण्यक (शितल तळपदे), गुमनाम है कोई! (प्रदिप मुळ्ये)

८. सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रदिप मुळ्ये (सोयरे सकळ), प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट), प्रदिप मुळ्ये (गुमनाम है कोई!)

९. सर्वोत्कृष्ट संगीत – अजित परब (सोयरे सकळ), राहुल रानडे (हॅम्लेट), कौशल इनामदार (जुगाड), राहुल रानडे (तिला काही सांगायचंय!), अविनाश-विश्वजीत (गुमनाम है कोई!)

१०. सर्वोत्कृष्ट रंगभूषा – सचिन वारिक (सोयरे सकळ), उल्लेश खंदारे (आरण्यक), राजेश परब (चि.सौ.का.रंगभूमी)

११. सर्वोत्कृष्ट वेषभूषा – गीता गोडबोले (सोयरे सकळ), प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट), मेघा जकाते (आरण्यक)

१२. विनोदी कलाकार – आशिष पवार (गलतीसे मिस्टेक), संजय खापरे (गलतीसे मिस्टेक), माधुरी गवळी (एपिक गडबड)

१३. विशेष ज्युरी पुरस्कार (घोषित) – सुमित राघवन (हॅम्लेट)

१४. लक्षवेधी अभिनेत्री (घोषित) – गौरी इंगवले (ओवी)

१५. लक्षवेधी नाटक (घोषित) – आरण्यक (अद्वैत थिएटर )

१६. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नाटक (घोषित) – तिला काही सांगायचंय ! (श्री चिंतामणी निर्मित)

१७. विशेष ज्युरीपु रस्कार- हॅम्लेट (जिगीषा आणि अष्टविनायक )

१८. सर्वोत्कृष्ट नाटक- सोयरे सकळ (भद्रकाली प्रोडक्शन),एक गुड न्युज आहे (सोनल प्रोडक्शन), गुमनाम है कोई ! (भद्रकाली प्रोडक्शन),

मालिका विभाग

१. सर्वोत्कृष्ट मालिका – ललित २०५ (सोहम प्रॉडक्शन्स – स्टार प्रवाह), फुलपाखरू (टिमअल्ट्रा क्रिएशन – झी युवा), ती फुलराणी (इंडियन मॅजिक आय- सोनी मराठी ), छत्रीवाली (टेल अटेल मिडीया – स्टार प्रवाह ), तु अशी जवळी रहा (सेवन्थ सेन्स मिडीया – झी युवा)

२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दीपक नलावडे / पुष्कर रासम (छोटी मालकीण – स्टार प्रवाह), मंदार देवस्थळी (फुलपाखरू – झी युवा ), केदार साळवी (वर्तुळ – झी युवा ), स्वप्निल मुरकर (ती फुलराणी – सोनी मराठी), गणेश रासने (तु अशी जवळी रहा –झी युवा)

३. सर्वोत्कृष्ट अभिनेता – समीर धर्माधिकारी (भेटी लागी जीवा), अक्षर कोठारी (छोटी मालकीण), यशोमन आपटे (फुलपाखरू), संतोष जुवेकर (ईयर डाउन), संकेत पाठक (छत्रीवाली)

४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नम्रता प्रधान (छत्रीवाली), प्रणाली घोगरे (ईयर डाउन), ऐतेशा संझगिरी (छोटी मालकीण), मयुरी वाघ (ती फुलराणी), ऋता दुर्गुळे (फुलपाखरू)

५. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता –विघ्नेश जोशी (भेटी लागी जीवा), गिरीश ओक (छोटी मालकीण), अशोक शिंदे (छत्रीवाली), मिलिंद गवळी (तु अशी जवळी रहा), वरद चव्हाण (ललित २०५)

६. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सुरेखा कुडची (नकळत सारे घडले), मुग्धा रानडे (भेटी लागी जीवा), आशा शेलार (छत्रीवाली), माधवी निमकर (ईयर डाउन), दीप्ती लेले (ती फुलराणी)

७. लक्षवेधी मालिका – वर्तुळ (झी युवा), विठू माऊली (स्टार प्रवाह), ईयर डाउन (सोनी मराठी)

८. विशेष ज्युरी पुरस्कार (घोषित) – भेटी लागी जीवा (सोनी मराठी)

९. सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी – न्युज १८ लोकमत, जय महाराष्ट्र, टिव्ही ९ मराठी, एबीपी माझा, साम मराठी

१०. सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक – कपिल देशपांडे (टिव्ही ९ मराठी), विशाल परदेशी (न्युज १८ लोकमत),

विनोद घाटगे (एबीपी माझा), दिपाली राणे (ई सकाळ)

११ पत्रकारिता पुरस्कार (घोषित) – शितल करदेकर

१२ पी.आर. पुरस्कार (घोषित) – प्लॅनेट आर्ट एनटरटेनमेंट मिडिया

१३ जीवन गौरव – रोहिणी हट्टंगडी

Story img Loader