अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती अभिनेता विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. मनविंदर सिंह, असे त्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तप्रदेशमधील लखनऊचा रहिवासी आहे. मनविंदरने सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी कौशल आणि कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर विकी कौशलने आरोपीविरोधात सांताक्रूझ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा- “मी खूप लोकप्रिय…” नाव न घेताच कार्तिक आर्यननं मारला करण जोहरला टोमणा

कतरिनाचा चाहता असल्याचा आरोपीचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनविंदर सिंह हा छोट्या मोठ्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे. आपण कतरिनाचा चाहता असल्याचा दावा त्याने केला आहे. तो कतरिना कैफला सोशल मीडियावर स्टॉक देखील करत होता. सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ५०६-II (गुन्हेगारी धमकावणे) आणि ३५४-डी (पीछे मारणे) अंतर्गत मनविंदरविरोधात एआयआर दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- Video : “मी विक्की कौशलसोबत…” मंडपात जाण्याआधी नवरीनं धरला भलताच हट्ट अन्…

अनेक कलाकारांना जीवे मारण्याची धमकी
काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेऊन स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी केली आहे. तपासानुसार बिश्नोई टोळीकडून बॉलिवूड कलाकारांकडून खंडीणी गोळा करण्याच्या उद्देशाने या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader