बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण आता सान्या मल्होत्रा एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. एका फोटोग्राफरला मदत करतानाचा सान्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे तिचं कौतुक केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रेटी जिथे जातील तिथे पॅपराजी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी जात असतात. सान्यासोबतही काहीसं असंच घडलंय. तिचे फोटो क्लिक करण्यासाठी आलेल्या एका फोटोग्राफरचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडणार एवढ्यात सान्यानं त्यांना आधार देत उभं राहायला मदत केली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर सान्याचे फोटो क्लिक करण्यासाठी आलेले दिसत आहेत. अशात फोटो क्लिक करण्यासाठी पुढे येत असलेल्या एका फोटोग्राफरचा तोल जातो आणि तो खाली पडणार तो सान्या धावत जाऊन त्यांना आधार देते. एवढंच नाही तर ती त्यांची आपुलकीनं चौकशी करते. त्यांना कुठे लागलं तर नाही ना असं विचारते. सान्याच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

सान्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते तिच्या चांगुलपणाचं कौतुक करताना दिसत आहेत. सान्याच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात विकी कौशल सोबत ‘सॅम बहादूर’मध्ये दिसणार आहे. अलिकडच्या काळात तिचा ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. ज्यात तिच्यासोबत अभिमन्यू दसानी मुख्य भूमिकेत होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanya malhotra help to photographer who fell while clicking pictures video goes viral mrj