बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच सान्याचा मीनाक्षी सुंदरेश्वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सान्याने कॉटन आणि सिल्कच्या साड्या परिधान केल्या होत्या. सान्याला या साड्या प्रचंड आवडल्या होत्या. एवढचं काय तर चित्रपटात सतत साड्या घातल्यामुळे ती जणू काही साड्यांच्या प्रेमात पडली. तर जेव्हा शूट संपलं तेव्हा तिने काही साड्या चोरल्या होत्या. याचा खुलासा सान्याने एका मुलाखतीत केला आहे.

सान्याने राजीव मसंदचा शो ‘Actors Roundtable 2021’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी सान्या म्हणाली, आम्ही पहिल्या लॉकडाउननंतर लगेच मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटाचे चित्रीकरण केले. तर एवढ्या दिवसानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन खूप आनंद झाला होता. मीनाक्षीसाठी तयार होणं आणि साड्या नेसणं मला खूप आवडतं होतं. मी त्या साड्या चोरल्या. त्यातली एक साडी मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नेसली होती.

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

मीनाक्षी सुंदरेश्वर हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिमन्यू आणि सान्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

Story img Loader