सुप्रसिद्ध ‘हरियाणवी डान्सर’ आणि स्टेज परफॉर्मर सपना चौधरी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सपना ही नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र आता सपना चौधरीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. नुकतंच तिने सोशल मीडियापासून दूर जाण्याचे कारण सांगितले आहे. यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत.

सपना चौधरी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिची तब्येत खराब असल्याचे सांगितले आहे. यावर पोस्ट करताना सपना चौधरी म्हणाली, ‘राम राम, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी अपडेट देऊ शकणार नाही. माफ करा, लवकरच भेटू.’

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
amitabh bachchan
नातीच्या शाळेतील कार्यक्रमाला गेलेल्या अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट म्हणाले…

सपना चौधरीची ही पोस्ट काही तासातच व्हायरल झाली आहे. तिची ही पोस्ट वाचून चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सपना चौधरी ही सोशल मीडियापासून किती दिवस दूर जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सपना चौधरी ही नुकतीच मध्य प्रदेशातील एका ठिकाणी परफॉर्मन्ससाठी गेली होती. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी तिच्या पोटात प्रचंड दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या ती तिच्या प्रकृतीची खूप काळजी घेत आहे.

“आम्ही IVF चा पर्याय निवडला पण मुंबईतील डॉक्टरांचा…”, अभिनेता फरदीन खानने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, सपना सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळे आणि डान्समुळे चर्चेचा विषय ठरत असते. काही दिवसापूर्वी भाजपाच्या एका खासदारांनी सपनाला ठुमकेवाली संबोधलं होतं. सपनाला ठुमकेवाली संबोधल्यानंतर तिने तिच्याच रोखठोक शैलीमध्ये या खासदारांना प्रत्युत्तर दिलं होतं. सपनाच्या अशाच पलटवार करण्याच्या अंदाजामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे.

Story img Loader