हरयाणामधील लोकप्रिय गायिका आणि डान्सर सपना चौधरी सुदैवाने रस्ते अपघातातून वाचली आहे. गुरुग्राम येथे तिच्या कारचा अपघात झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास खरेदी करुन सपना परतत असताना सपनाच्या गाडीला भरधाव कारने टक्कर दिली. पण सुदैवाने सपना आणि तिच्या कार चालकाला दुखापत झाली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सपनाने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. स्थानिकांच्या मते, कारची टक्कर झाल्यानंतर सपनाच्या गाडी चालकाने गाडी थांबवली पण दुसऱ्या गाडीचा चालक तेथून फरार झाला. त्यामुळे गाडीचा नंबर आणि गाडीचा चालक कोण आहे अद्याप कळालेले नाही.
या अपघातामध्ये सपनाच्या गाडीचे नुकसान झाले आहे. सपनाने अद्याप या विरोधात पोलिसात तक्रार केलेली नसून तिने तक्रार करताच या विरोधात करावाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक मुकेश यांनी म्हटले आहे.
First published on: 28-12-2019 at 13:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sapna choudhary escapes a near fatal accident in gurugram after a high speed car hit her vehicle avb