आपली दमदार गाणी आणि डान्स मूव्हसाठी प्रसिद्ध असलेली हरियाणाची डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या पोस्टमुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तिच्या एका पोस्टची चर्चा सगळीकडे आहे. यावेळी तिने कोणती डान्स स्टेप पोस्ट न करता आपल्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सपनाने पोस्टमध्ये लिहलं आपले वडील भूपेंद्र अत्री यांची आठवण काढताना ती दिसत आहे. ज्यांना सपना चौधरीने लहान वयात गमावले. आता सपना चौधरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने ही पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये सपना तिच्या वडिलांच्या फोटोसमोर बसली आहे. सपना चौधरी तिच्या वडिलांच्या फोटोकडे खूप प्रेमाने बघत आहे. ‘जुदाई’ चित्रपटातील ‘तू मेरी जान है हे गाणे व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर लावले आहे.

चाहत्यांच्या गर्दीतून दिशाला सुखरूप नेणारी व्यक्ती आहे तरी कोण? नेटकरी म्हणाले “हा तर…”

सपनाच्या वडिलांचे निधन २००८ साली एका आजरामुळे झाले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सपना चौधरीने लिहिले की, ‘मी तुम्हाला माझ्या डोळ्यांनी कधीही पाहू शकत नाही, माझ्या हातांनी स्पर्श करू शकत नाही. पण मी नेहमी तुम्हाला माझ्या हृदयात अनुभवेन. सपनाच्या या इमोशनल व्हिडिओवर चाहतेही कमेंट करत आहेत.

सपना चौधरीच्या नृत्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. बॉलिवूड चित्रपटातील आयटम सॉंग्समध्ये देखील ती नृत्य करताना दिसली आहे. सपनाने आपल्या करिअरची सुरुवात हरियाणातील ऑर्केस्ट्रा टीममधून केली होती. सपना चौधरीने रागनी कलाकारांच्या टीममधला एक भाग बनून करिअरची सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sapna choudhary getting emotional and missing father bhupendra attri shared video and said i will feel you spg